भुसावळ प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतल्याने अखेर महिनाभरात भुसावळातल्या रस्त्यांवरील खड्डे बुजले जाणार आहेत.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वतः माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासोबत चर्चा करून नूतन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना एका महिन्यात भुसावळ शहरातील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या दि.२५ ऑगस्ट रोजीच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी भुसावळच्या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल माहिती मागवली होती.त्यानुसार मुख्याधिकारी यांना पालकमंत्री यांनी धारेवर धरले. निधी असूनही शहरातील खड्डे का बुजवले जात नाही ही विचारणा केली. त्यानंतर एकनाथ खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या सोबत चर्चा करून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी जनार्दन पवार यांनी एका महिन्यात खड्डे बुजवण्याचे आदेश मुख्याधिकारी चिद्रवार यांना दिले.
या संदर्भात मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आदेश आला आहे.त्यावर तातडीने कारवाई करून एका महिन्यात पूर्ण शहर खड्डे मुक्त करणार
आहोत.