जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ क्रुझरवरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत अचानक वळण घेतल्याने मागून येणाऱ्या वाहनाचे नुकसान झाल्याची घटना गुरूवारी २५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता क्रुझर वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील दत्ता कॉलनीत डॉ. अशोक अर्जुन पाटील हे वास्तव्यास आहे. गुरूवार २५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते (एमएच १९, सीझेड ७०९९) क्रमांकाच्या कारने गोविंदा रिक्षा स्टॉपजवळून जात होते. यावेळी त्यांच्या वाहनापुढे (एमएच १८, एजे ७५४५) क्रमांकाची क्रुझर गाडी चालत होती. त्या वाहनाने अचानक वळण घेत भरधाव वेगाने वाहन चालवित होता. मागून चालणाऱ्या कारला जोरात ओढून देत गाडीचे नुकसान केले. त्यामुळे डॉ. अशोक पाटील यांनी लागलीच दुपारी ४ वाजता शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार क्रुझर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोहेकॉ अल्का वानखेडे या करीत आहे.