एरंडोल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |एरंडोल तालुक्यातील उतरण शिवारात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लिंबू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून अनेक घरांवरचे पत्रे ही उडाली आहेत तसेच निलॉन्स कंपनीचे शेडही कोसळले.
आ. चिमणराव पाटील यांनी उत्राण येथे वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. या वेळी नुकसान झालेल्या सर्व पिकांचे,घरांचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार,कृषी अधिकारी यांना केल्यात तसेच नुकसान भरपाई मिळवून देण्याचे शेतकऱ्यांना आश्वासित केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदचे मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,पारोळा ना.शि.मंडळाचे चेअरमन मिलिंद मिसर, पंचायत समितीचे मा.सभापती अनिल महाजन,बाजार समितीचे मा. सभापती शालिकभाऊ गायकवाड,उत्राणचे सरपंच आनंदा धनगर,कृषी अधिकारी,कृषी सहायक,मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.