एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |शहरातील काशिनाथ चौकातून जात असलेल्या कारला मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने ओव्हरटेक केल्याने कारला धडक दिली. यात कारचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. या संदर्भात रात्री ८ वाजता ट्रॅक्टरवरील चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, रमेश ओंकार पाटील (वय-७३ रा.पाचोरा ता. जि.जळगाव) हे वृद्ध शेतकरी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी ते जळगावात कार क्रमांक (एमएच ०५ बी एस ३१४७) ने आले होते. काम आटपून सायंकाळी ५ वाजता ते घरी जायला निघाले होते. त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एमपी ०९ एचजी ६९३६) ने मागून ओव्हरटेक करत त्यांचे गाडीला धडक दिली. या अपघातात कारचे मागचे बंपर तुटून नुकसान झाले आहे. या घटनेनंतर कारचालक रमेश पाटील यांनी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार ट्रॅक्टर चालक शाहिद हुसेन मोहम्मद रा. उज्जैन, मध्य प्रदेश याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.