भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कपिल नगर जवळील राष्ट्रीय महामार्गावरील नाल्यावरील स्लॅबतोडून नुकसान करत लोखंडी आसाऱ्या चोरून नेल्याची घटना गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ ते वरणगाव दरम्यान असलेल्या कपिल नगर येथे संशयित आरोपी सागर मधुकर इंगळे, दुर्योधन सुभाष सुरळकर आणि किशोर वाघ सर्व राहणार कपिल नगर, ता.भुसावळ यांनी राष्ट्रीय महामार्गावर नाल्यावरील स्लॅब तोडून लोखंडी असणारी चोरून नेल्याचे समोर आले आहे. या संदर्भात भूषण संजय कुंभार (वय-२६) रा. साकेगाव ता.भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर मधुकर इंगळे, दुर्योधन सुभाष सुरळकर आणि किशोर वाघ सर्व राहणार कपिल नगर, ता.भुसावळ या तिघांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पो.हे.कॉ. मनोहर पाटील करत आहे.