डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे आयोजन महात्मा गांधी उद्यान करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे आयोजन आता भाऊंच्या उद्यानात  करण्यात येणार आहे.

 

 

एका भारतीय व्यक्तीचा जगातील १२०  पेक्षा अधिक देश सन्मान म्हणून टपाल तिकीट काढतात. ती १२०  देशांतील मुळ टपाल तिकीटे गांधी रिसर्च फाउंडेशनकडे उपलब्ध आहे.  ही जळगावकरांसाठी मोठी गौरवाची बाब असून या तिकीटांचे ‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे  आयोजन गांधी उद्यानात करण्यात आले. त्याला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  गांधी जयंती पंधरवाड्यात जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून आयोजीत हे प्रदर्शन खास जळगावकरांच्या आग्रहास्तव भाऊंचे उद्यान येेथे प्रदर्शीत करण्यात आले आहे. वानखेडे गॅलरीमध्ये दि. १८   ते २३  ऑक्टोबर पर्यंत भाऊंच्या उद्यानाच्या वेळेत सकाळी ६  ते ९  व संध्याकाळी ५  ते ९  वाजेदरम्यान पाहता येईल. पोस्टाच्या स्टॅम्पवर महात्मा गांधीजींच्या वेगवेगळ्या विषयांवर स्टॅम्प निघालेली आहेत. जगात महात्मा गांधीजी हे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांचे इतक्या देशांमध्ये तिकिटे आहेत. महात्मा गांधीजींच्या टपाल तिकिटांचे जनसामान्यांसाठी प्रदर्शन आयोजित केले आहे. देश-विदेशातील तिकिटे पाहिली तर गांधीजींचे संपूर्ण जीवन चरित्र पहायची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून जळगावकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘डाक टिकटों में महात्मा’ या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content