जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा येथील सोमानी मार्केट येथील डेअरी दुकानदाराला काहीही कारण नसतांना दोन जणांनी शिवीगाळ करून कोल्ड्रींग्जची बाटली डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ९ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. या संदर्भात रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप कन्यालाल रामचंदानी वय ५२ रा. जिल्हा बँक कॉलनी, पिंप्राळा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे पिंप्राळ परिसरातील सोमाणी मार्केट जवळशिवम दूध डेरी दुकान आहे. दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान रविवारी ९ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांच्या दुकानावर गंप्या आणि पप्पू नावाची दोन व्यक्ती येऊन त्यांनी काही कारण नसताना दुकानदार दिलीप रामचंदानी यांना शिवीगाळ करत दुकानातील कोल्ड्रिंगची भरलेली काचेची बाटली डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर दिलीप रामचंदानी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११ वाजता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करत आहे.