चोपडा येथील किडझी प्रिस्कुलमध्ये दहीहंडी साजरी

chopada 4

 

चोपडा प्रतिनिधी । येथील बोरोलेनगरातील किडझी प्रिस्कुलमध्ये नुकतीच दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी, किडझी प्रिस्कुलमध्ये दहीहंडी सजावटीची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत निलोफेर इरफान जहागिरदार, नेहा राखेचा, दिपाली जैन हे तिघजण विजेते ठरले आहेत. संस्थेच्या मुख्यध्यापिका सुनीता पाटील यांचा हस्ते त्यांच्या गौरव करण्यात आला. तसेच सर्वच विद्यार्थींनी राधाकृष्णाचे रूप धारण केले होते. यासोबत येथील शिक्षिकांनी सुध्दा राधाकृष्णाचे रूप धारण केले होते. यात सुगणा जैन या कृष्ण तर राधा शीतल शर्मा, आणि यशोदा नेहा जैन बनल्या होत्या. यशोदा नेहा जैन यांनी सर्व बालगोपालना दही खायला दिले. तर मनीषा पाटील यांनी कृष्णाच्या पाळणाचे पूजन केले. किडझी प्रिस्कुल प्राचार्य सुनीता पाटील यांनी दहीहंडी व बालगोपाल कृष्ण मनुयु कानकेची टीका लावून पूजा केली. तसेच मनुयु कानके आणि सुगणा जैन यांनी दहीहंडी फोडली आणि प्रसाद वाटप करण्यात आला. कु.शीतल शर्मा यांनी सर्व बाल गोपालांना ‘गोविंदा आला रे गोविंदा आला ….. या गाण्यावर ताल धारत तुफान धम्माल केली.

यावेळी पालकवर्गनेही आनंद लुटला. शाळेचे संस्थापक चेअरमन डॉ. विजय टी. पाटील हे उपस्थित होते. यांनी बालगोपालसह शिक्षिकांचे कौतुक केले.

Protected Content