यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात आपल्या दैदिप्यमान कामगिरीने महाराष्ट्राच्या शिरपेचात दिवसेंदिवस नवनवीन खिताब रोवण्याचा विडा उचलून कार्य करणाऱ्या व आपल्या कार्यात नेहमी सातत्य ठेवून महाराष्ट्राच्या दैदिप्यमान अशा इतिहासात आपल्या गायन शैलीच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात नावलौकिक मिळविलेली जोडगोडी डिगंबर सिताराम तायडे व शकुंतला डिगंबर तायडे या तायडे दाम्पत्याने पुन्हा आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत महाराष्ट्राच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. सदरील जोडगोडीला त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना सिनेमा क्षेत्राचे पितामह दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
अंधेरी (मुंबई) येथे दि.१९ जानेवारी रविवार रोजी आयोजित कार्यक्रमात हॅालीवूडचे नावाजलेले नव अभीनेता मिहीर जैस्वाल,रणजीत कवाले तसेच सिने अभिनेत्री सिमा कुलकर्णी व अभिनेत्री मॅाडेल स्वेता जैस्वाल आणि मान्यवर डायरेक्टर व इतर सिने कलाकार,राजकीय व्यक्ती व दादासाहेब फाळके पुरस्काराचे आयोजक अमोल भगत व ज्यूरी यांच्या प्रमुख उपस्थितीत डिगंबर सिताराम तायडे यांना दादासाहेब फाळके “जीवन गौरव पुरस्कार” व शकुंतला डिगंबर तायडे यांना दादासाहेब फाळके “भारतीय नारी शक्ती “ पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.परिणामी सदरील जोडगोडीने दादासाहेब फाळके “जीवन गौरव पुरस्कार” व दादासाहेब फाळके “भारतीय नारी शक्ती “ पुरस्कार प्राप्त करून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्याची जबाबदारी पार पडली आहे हे विशेष !.
दरम्यान गायन क्षेत्राची आन-बाण-शान बनून आपल्या गायनाच्या माध्यमातून दिवसेंदिवस एकामागून एक खिताब आपल्यासह महाराष्ट्राच्या इतिहासातील शिरपेचात मानाचा तुरा रोवून महाराष्ट्राचे नाव देशात नव्हे तर परदेशात गाजविणारे तसेच जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या डोंगर कठोरा या लहानशा खेडेगावातील मुळ रहिवाशी व सध्या डोंबिवली येथे वास्त्यव्यास असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधीकरणाचे सीव्हील इंजिनिअर डॉ. डिगंबर तायडे यांना अति उच्च असा दादासाहेब फाळके “जिवन गौरव पुरस्कार” व शकुंतला डिगंबर तायडे यांना दादासाहेब फाळके “भारतीय नारी शक्ती “ पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला असून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात भर टाकणारी व महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचविणारी ठरली आहे.सदरील जोडगोडी डिगंबर सिताराम तायडे व शकुंतला डिगंबर तायडे यांच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल डॉ.डिगंबर सीताराम तायडे व शकुंतला डिगंबर तायडे यांचे महाराष्ट्र भरातून तसेच देशभरातून व विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.या माध्यमातून डॉ.डिगंबर सीताराम तायडे व शकुंतला डिगंबर तायडे यांनी केलेल्या कार्याबद्दल “माझा सलाम” अशीच धारणा तमाम महाराष्ट्रवासीयांमध्ये निर्माण होणेस सार्थ ठरते.