नवी दिल्ली वृत्तसंस्था । ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना चित्रपट क्षेत्राचा मानाचा समजला जाणारा फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात आजारी असल्याने बिग बी उपस्थित राहू शकले नाही, त्यामुळे २९ डिसेंबरला त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती ‘माहिती व प्रसारण मंत्री’ प्रकाश जावडेकर यांनी दिलीय.
‘२९ डिसेंबरला एका औपचारिक कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.’ सिनेक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २०१८ सालचा दादासाहेब फाळके सन्मानाने ७७ वर्षीय अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात येणार होते, मात्र बच्चन यांची तब्येत ठीक नसल्याने ते या समारंभात उपस्थित राहू शकले नाहीत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारपासून राजधानीत नाहीत त्यामुळे २९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे. याच कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांचाही सन्मान केला जाणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.