डी.जे. पाहण्यावरून मुलाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दांडेकर नगरात डीजे पाहण्यासाठी गेलेल्या एका मुलाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २९फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीसात मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सर्फराज शेख सुलेमान वय १७ रा. गेंदालाल मिल,जळगाव हा मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार २८ फेब्रुवारी रोजी दांडेकर नगरात डीजे पाहण्यासाठी सर्फराज गेला होता. याचा राग आल्याने त्याठिकाणी उभा असलेला अक्षय व त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर सर्फराज शेख सुलेमान याने गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content