Home क्राईम सिलेंडरचा भडका; चौघं भाजले

सिलेंडरचा भडका; चौघं भाजले


पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात सामोसे तयार करण्याच्या कारखान्यात सिलेंडरच्या उडालेल्या भडक्यात चार मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमीतील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.गॅसचा भडका एवढा मोठा होता की त्यातला एक जण काही अंतरावर फेकला गेला.

पुण्यात कर्वेनगर भागात मुख्य चौकाजवळ असलेल्या भालेकर एम्पायर इमारतीच्या तळ मजल्यावर सकाळी सहा वाजेच्या सुमारास चार मजूर सामोसे तयार करत होते. त्यावेळी शेगडीला गॅस पुरवठा करणाऱ्या सिलेंडरची नळी निघाल्याने गॅसचा मोठा भडका उडाला.त्यात अन्नू चौहान आणि इतर तिघे जण गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound