टेलिकॉम कंपन्यांचे नुकसान भरपाईसाठी ग्राहक वेठीला

mob

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी नुकसानीची भरपाई करण्यासाठी त्यांच्या ग्राहकांना ‘रिकव्हरी’ करण्यासाठी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ३ डिसेंबरपासून व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेलने प्रीपेड दर वाढवला असून आता पोस्टपेड ही दर वाढविण्याच्या मार्गावर आहे, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

सध्या जिओने प्लानच्या वाढत्या दराची घोषणा केली नाही. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओकडून मोबाइल कॉल आणि इंटरनेट दरात ४० टक्के वाढ केली असली तरी हे दर इतर कंपन्याच्या तुलनेत स्वस्त असण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात पहिल्यांदा टेलिकॉम कंपन्यांनी किंमती वाढवल्या आहेत. याआधी टेलिकॉम सेक्टरमध्ये टॅरिफ वॉर सुरू होता. यामुळे २०१६ मध्ये कॉलिंग जवळजवळ फ्री होती. तसेच डेटाच्या किंमतीत ९५ टक्के घसरण झाली होती. डेटाची किंमत २०१४ साली २६९ रुपये प्रति जीबीवरून ११.७८ रुपये प्रती जीबी झाली होती. भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया कडून प्रीपेड प्लानच्या किंमतीत ५० टक्के वाढ होणार असल्याने ऑपरेटरांच्या मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Protected Content