मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ईडीकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे. मात्र जोवर आरोपपत्राची कॉपी मिळत नाही, तोवर या खटल्याची सुनावणी दैनंदिनरित्या चालणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ईडी कायम आरोपींना आरोपपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचं निदर्शनास आल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांना आज तरी जामीन मिळणार का ? याबाबत मोठी उत्सुकता लागली असतांना त्यांना पुन्हा एकदा वाढीय कोठडी मिळाल्यामुळे कारागृहातील त्यांचा मुक्काम लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.