भुसावळात दोन गावठी पिस्तूलासह दोघांना अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन गावठी बनावटीच्या पिस्तूलासह दोन जणांना भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी अटक केली असून दोन गावठी पिस्तूल आणि ५ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील तनारीका हॉटेल मागील गोलानी कॉम्प्लेक्स मधील दुर्गा माता मंदिर जवळ रोडवर दोन इसम गावठी पिस्टल सोबत बाळगत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली .गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून मिळालेल्या माहिती संदर्भात सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथक घटनास्थळी पोहचून सापळा रचून सैय्यद सिकंदर बशरत अली (वय-४२) रा. कवाडे नगर भुसावळ आणि नरेश देविदास सुरवाडे (वय-२९) रा. गोलानी कॉम्प्लेक्स हनुमान मंदिर जवळ भुसावळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे दोन पिस्टल व जिवंत काडतुसे हस्तगत केले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content