जिल्ह्यात ७ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश; अपर जिल्हादंडाधिकारी राहूल पाटील यांचे आदेश

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ७ एप्रिल पर्यंत जमाव बंदीचे आदेश काढण्यात आले आहे. अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळविले आहे.

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ७ एप्रिल २०२२ पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेत यात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!