Home क्राईम कंत्राटदाराच्या डंपरने चिरडले : पुरनाड फाट्यावर तीन ठार तर एक जखमी !

कंत्राटदाराच्या डंपरने चिरडले : पुरनाड फाट्यावर तीन ठार तर एक जखमी !

0
327


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बड्या कंत्राटदाराच्या भरधाव डंपरने मोटारसायकलला उडविले असून यात दाम्पत्यासह त्यांची दोन मुले ठार झाल्याची धक्कादायक घटना पुरनाड फाट्याजवळ घडली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भरधाव एमएच 19 सीएक्स 2038 क्रमांकाच्या डंपरने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला उडविले. यात मोटारसायकलवरील दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातामुळे मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूरच्या दरम्यानच्या असुरक्षीत वाहतुकीचा मुद्दा नव्याने अधोरेखीत झाला आहे. हायवेचे काम घेतलेल्या कंत्राटदाराची अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचे आधी देखील दिसून आले असून या अनुषंगाने आज भरधाव डंपरने 4 जणांचा जीव घेतल्याने परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.

संतप्त नागरिकांनी डंपरची तोडफोड केली. तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. सदरचा ठेकेदार गब्बर असून त्याला अनेक राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याने त्याची मुजोरी सुरू असते. आता तर त्याच्या डंपरने 3 जीव घेतल्याने याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, मोटारसायकलवरील तिघांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून त्यांची ओळख पटविण्यात येत आहे. तर, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.


Protected Content

Play sound