गुरांची निर्दयतेने वाहतूक; पाच गुरांची सुटका, दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विदगाव ते जळगाव रोडवरील धामणगाव फाट्याजवळून विना परवाना वाहनात गुरांना निदर्यीपणे कोंबून त्यांची वाहतुक करणाऱ्यांवर वाहनावर जळगाव तालुका पोलिसांच्या पथकाने रविवारी २१ जुलै रोजी सकाळी ६ वाजता कारवाई केली. या वाहनातून पाच गुरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दुपारी १ वाजता तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विदगाव ते जळगाव रोडवरील धामणगाव फाट्याजवळ रविवार २१ जुलै रोजी सकाळी ६ वाजता (एमपी ४६, जी ३१०७) क्रमांकाच्या वाहनातून पाच गुरांना जखडून त्यांची क्रूरपणे वाहतुक करीत असल्याची माहिती जळगाव तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यापथकाने वाहनाची तपासणी केली असता, वाहनात गुरे निदर्यीपणे कोंबून ठेवले होते. तसेच वाहन चालकाकडे वाहनाचा परवाना आणि कागदपत्रे मागितली. परंतु त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे नव्हती. तसेच वाहन चालक वाहन सोडून पळून गेला. पोलिसांनी वाहनातील सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांच्या गुरांची सुटका करुन त्यांची गो-शाळेत रवानगी करण्यात आली. याप्रकरणी पोहेकॉ सुधाकर शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दुपारी १ वाजता वाहन चालकासह मालक (नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीपक राजपूत हे करीत आहे.

Protected Content