मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई करत, चारचाकी वाहनातून गुरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी आरोपीस अटक केल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहन क्रमांक (एमएच ४८ एवाय ०३५६) असलेल्या चारचाकी वाहनात बैलांची निर्दयतेने वाहतूक केली जात होती. हा प्रकार मुक्ताईनगर ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर खडसे फार्म हाऊस जवळून वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली. त्याठिकाणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि वाहनातील गुरांची सुटका केली. पोलीसांनी केलेल्या चौकशीत संबंधित वाहनातून गुरांची अत्यंत निर्दयतेने वाहतूक होत असल्याने निष्पन्न झाले. वाहनात गुरांना कोंबून आणले होते. याप्रकरणी पोलीसांनी संशयित आरोपी म्हणून मन्यार शेख मुस्तफा शेख अरमान (वय २५) रा. सिडफार्म, मुक्ताईनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संदीप वानखेडे हे करीत आहेत.