बोरनार येथे विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोरनार येथे आषाढी एकादशी निमित्त येथील विठ्ठल-रूख्माई मंदीरात रविवारी १० जुलै रोजी सकाळी ७ वाजेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सकाळपासून भाविकांनी विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

 

जळगाव तालुक्यातील बोरनार गावात विठ्ठल रूख्माईचे मंदीर गिरणा नदीवर वसलेले आहे. विठूरायाचे स्वयंभू असे मोठे मंदीर आहे. हे मंदीराला ४० वर्षांचा इतिहास आहे. रविवारी १० जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त मंदीर संस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजता महाप्रसादाहस भजन, किर्तनात विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला. या मंदीरात दर महिन्याच्या एकादशीला किर्तन हरीपाठ होत असतो.

 

सकाळी गावातून वारकऱ्यांनी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत  सरपंच कल्पना चौधरी, उपसरपंच सुरेश थोरात, ग्रामपंचायत सदस्य वैशाली कोळी, सयाबाई चिंचोरे, मंगलाबाई मराठे, रमदामी पठाण, कल्पना चौधरी, मंदाबाई बडगुजर, श्याम ठाकूर, छोटू देशमुख, बुशरा देशमुख, ग्रामविकास अधिकारी एस.जी.पवार, सुरेश तेज्वमल, पप्पू सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप उगले, स्वप्निल पाटील, हेमंत पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content