अमळनेर तालुक्यातील वादळी पावसाने पीकांचे नुकसान; आदेश प्राप्त होताच पंचनामे

अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील वादळी पावसाने कांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्यासाठी कृषीची टीम तयार करण्यात आली असून अजूनही दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने आदेश प्राप्त होताच पंचनामे करण्यात येतील असे कृषी अधिकारी भरत वारे यांनी सांगितले

या प्रसंगी ते म्हणाले की, “काल दिनांक ७ व ८ च्या दुपारपर्यंत झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील पिकांना अक्षरशः झोडपून काढले आहे , यात प्रत्येक कृषी सहायककडून पीक निहाय नुकसानीची आकडेवारी घेण्यात आली असून त्यानुसार टीम तयार करण्यात आल्या आहे. अजून दोन दिवस हवामान खात्याने जिल्ह्यात येलो अलर्ट दिल्याने त्यानंतर आदेशातील मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच नुकसान ग्रस्थ भागातील शेतीपिकांचे पंचनामे करण्यात येतील व लागलीच अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू.”

अमळनेर तालुक्यात दिनांक ७ च्या रात्री ते दिनांक ८ च्या पहाटेपर्यंत आठही महसूल मंडळात १२० मिमी बेमोसमी वादळी पाऊस कोसळल्याने संपूर्ण तालुक्यातील ११४ गावातील ४ हजार २१५ हेक्टरी वरील रब्बी पिकांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून या वादळी पावसाचा फटका सर्वाधिक प्रमाणात पाडळसरे परिसरातील तापी व पांझरा पट्याला बसल्याने रब्बी हंगामातील गहू, मका,कांदा, हरभरा, बाजरी, दादर उन्हाळी ज्वारी, मूग या पिकांना बसला आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून पुन्हा त्यास आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषीची टीम तयार करण्यात आली असून अजूनही दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने आदेश प्राप्त होताच पंचनामे करण्यात येतील असे कृषी अधिकारी भरत वारे यांनी सांगितले

ऐन कापणीवर आलेली रब्बी पिकं काढणीस तयार असतांना सोमवारी रात्री ८ पासून व मंगळवारी दुपारी २ पर्यंत अमळनेर तालुक्यात वेगवान वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाल्याचे चित्र आठही महसूल मंडळात दिसून आले यात कापणी केलेला हरभरा ही हवेमुळे शेतात विखुरलेल्या अवस्थेत उडून पडल्याने तोही भिजून अंकुर काढू लागला तर मका व गहू, कांदा, बाजरी, दादर पिकावर लोड फिरल्यासारखी पिकांची अवस्था वादळी वाऱ्यामुळे दिसून आली. रात्र असल्याने पावसाचा व वादळी वाऱ्याचा गंभीर परिस्थितीत अनेक शेतकरी कापलेला हरभरा झाकून ठेवण्यासाठी उशिरापर्यंत शेतात थांबून होते. मात्र पहाटे उजाळल्यावर झाकलेल्या ताडपत्री पाल हवेने उडवून नेले व हरभरा पूर्ण शेतात विखरून टाकला होता तर उभ्या मक्याला व गहू दादर बाजरीला पूर्ण आडवी पडल्याने जमीनदोस्त झाली होती

याबाबत महसूल विभागाने पर्जन्यमान आकडेवारी जारी केली असून त्यात आठही महसूल मंडळात १२० मिमी पाऊस पडला असल्याने तालुक्यातील ११४ गावातील पिकांना या वादळी वाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून त्यात ३३ टक्याचा वर नुकसान झालेल्या ४ हजार २१५ हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या आकडेवारीत दिसून येतो ,

मंडळ निहाय आकडेवारी

अमळनेर मंडळ -१९ मिमी
शिरूड मंडळ -०७ मिमी
पातोंडा मंडळ – २५ मिमी
मारवड मंडळ – १० मिमी
नगाव मंडळ -०४ मिमी
अमळगाव मंडळ -२० मिमी
भरवस मंडळ -१८ मिमी
वावडे मंडळ -१७ मिमी

असे एकूण १२० मिमी पर्जन्यमान तालुक्यात काल रात्री झाले त्यात पाडळसरे येथील जलविज्ञान प्रयोग शाळेत २७ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

तालुक्यात रब्बीची पीक निहाय नुकसान झालेली आकडेवारी (हेक्टरमध्ये)

रब्बी ज्वारी -६५० हेक्टर
गहू – ११७० हेक्टर
हरभरा -३१५ हेक्टर
मका -१८६० हेक्टर
कांदा -१८० हेक्टर
व इतर पिके ४० हेक्टर

अशाप्रकारे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे त्यात ६०२१ बाधित शेतकऱ्यांचा शेती पीकांना फटका बसला आहे.

Protected Content