कोविशिल्ड लस सरकारला दोनशेत तर नागरिकांना हजार रूपयात मिळणार !

पुणे प्रतिनिधी । कोरोनाच्या लसीकरणाची जय्यत तयारी सुरू असतांना ही लस सर्वसामान्यांना परवडणारी असेल असे नमूद करतांनाच सिरम इन्स्टीट्युटचे संचालक अदार पूनावाला यांनी याचे मूल्य जाहीर केले आहे.

कोविशिल्ड या लसीचे उत्पादन होत असलेल्या सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी कोरोनाच्या लसीच्या किमतीबाबत मोठी घोषणा केली आहे.

अदार पूनावाला यांनी कोरोनाच्या लसीच्या किमतीबाबत माहिती देताना सांगितले की, सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार होत असलेली ऑक्सफर्डची कोरोनावरील लस सरकारला २०० रुपयांमध्ये दिली जाईल. तर सर्वसामान्य जनतेला ही लस एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. पुण्यातील सीरम इन्स्टिस्ट्यूटमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका यांनी तयार केलेल्या कोविशिल्ड या लसीचे उत्पादन सुरू आहे.

 

Protected Content