चुंचाळे येथील दोन भावंडांच्या मृत्यू प्रकरणी चुलत्याला पोलीस कोठडी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील दोन भावंडांना विहिरीत फेकून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चुलत काकाला आज न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.

यावल तालुक्यातील चुंचाळे गावात दिनांक २७ ऑक्टोबर रोजी माणुसकीला काळीमा फासणारी मनाला सुन्न करणारी दोन सख्ये भावंडे हितेश साळवे व रितेश सावळे यांच्या विहीरीत मरण पावल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आली होती. दरम्यान या चिमकुल्या बालकाच्या दुदैवी मृत्युला कारणीभुत असलेला संशयीत आरोपी म्हणुन त्यांचा चुलत काका निलेश सुधाकर सावळे राहणार जळगाव याच्याविरुद्ध रविन्द्र मधुकर सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर निलेश यास अटक करण्यात आली होती.

संशयीत आरोपी विरुद्ध भादवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , आज त्याला यावलच्या न्यायालयात हजर केले असता त्यास न्या .एम एस बनचरे यांनी एक दिवसाच्या पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे . दरम्यान काल यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली . रात्री उशीरा पर्यंत त्या दुदैवीरित्या मृत्यु पावलेल्या चिमकुल्या दोघ भावंडावर अत्यंत शोकाकुल वातावरणात शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंविधी करण्यात आले

 

Protected Content