Home राज्य न्यायलयीन बंदीवान महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

न्यायलयीन बंदीवान महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू


भंडारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भंडारा जिल्हा कारागृहातून मोठी बातमी समोर आली आहे. येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदी असलेल्या महिलेचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मृत्यूचे आदेश भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहे.

मीनाक्षी संजय वाडीचार या मृत बंदीवान महिलेचे नाव असून त्यांची ३ फेब्रुवारी रोजी अचानक प्रकृती खालावली. त्यांना भंडारा येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती सतत खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ८ फेब्रुवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नागपूरमधील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी भंडारा उपविभागीय अधिकारी यांना या चौकशीचे आदेश दिले आहे.


Protected Content

Play sound