भडगाव (प्रतिनिधी)। द्वितीय वर्षाच्या रसायनशास्त्र व भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी विद्यापीठस्तरीय कार्यशाळा येथील रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतीच पार पडली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एकूण 160 प्राध्यापक व अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी या कार्यशाळेत आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस. सूर्यवंशी यांच्याहस्ते पार पडले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख, पारोळा येथील किसान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय.व्ही. पाटील, रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एस. राजपूत (दोंडाईचा), भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. व्ही. जे. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड हे उपस्थित होते. सी.बी.सी.एस. पद्धतीप्रमाणे अभ्यासक्रम पुनर्रचना
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
रसायनशास्त्र व भूगोल या दोन्ही विषयांच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना विद्यापीठ अनुदान आयोग व विद्यापीठ यांनी सुचवलेल्या निर्देशानुसार करण्यात आली. दोन्ही अभ्यास मंडळांचे सदस्य व व विषय तज्ञ प्राध्यापक यांनी अभ्यासक्रमाची पुनर्रचना करताना आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.एच.ए. महाजन, डॉ.ए.एम. नेमाडे, डॉ.व्ही.जे. पाटील, डॉ.जी.एच. सोनवणे तसेच भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. शिवाजी पाटील, डॉ.एस.के. शेलार, डॉ.प्रज्ञा जंगले, डॉ.आर.व्ही. भोळे, डॉ.गोराणे व डॉ.वैशंपायन हे उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य प्रा.एस.आर. पाटील, समन्वयक डॉ.एस.डी. भैसे, प्रा.एम.डी. बिर्ला, प्रा.एल.जी. कांबळे, प्रा.एस.जी. शेलार, प्रा.एस.एम. झाल्टे, प्रा.डी.ए. मस्की, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कार्य केले.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. नितीन बारी, प्राचार्य वाय.व्ही. पाटील, डॉ.एस.एस.राजपूत व डॉ.व्ही.जे.पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड होते. प्राचार्य डॉ. एन.एन.गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जी.एस.अहीरराव, प्रा. एस.एम.झाल्टे व प्रा. डी.ए.मस्की यांनी विविध सत्रांचे सूत्रसंचालन केले तर प्रा. एस.आर.पाटील व डॉ.एस.डी.भैसे यांनी आभार मानले.