जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा येथील हॉटेल प्रधान समोर भरधाव कारने दुसऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २७ जानेवारी रोजी साडेचार वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनराज नारायण पाटील वय ६२ रा. मुक्ताईनगर कॉलनी, दत्त मंदीराजवळ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता त्याचे पत्नीसोबत कार क्रमांक (एमएच १९ सीयू ११६७) ने जळगावकडून पाचोरा येथे जाण्यासाठी वावडदा येथील हॉटेल प्रधान समोरून जात होते. त्यावेळी समोरून येणारी कार क्रमांक (एमएच १४ ईयू ९४४४)ने चुकीच्या मार्गाने येवून धनराज पाटील याच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत धनराज पाटील व त्याच्या पत्नी हे जखमी झाले. व कारचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी शनिवारी २७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.