खोटे कागदपत्र देवून वृध्दाची ५ लाखांमध्ये फसवणूक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक जिल्ह्यात २ वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॉट घेण्यासाठी टोकन व बुकिंग म्हणून दिलेले ४ लाख ९५ हजार ३९० रुपये परत न देता खोटे दस्ताएवज देऊन गोपालसिंग भिमसिंग राजपूत (वय-६६, रा. पिंप्राळा, जळगाव) यांची फसवणूक केल्याची घटना समोर आले आहे याप्रकरणी शुक्रवार २६ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता याप्रकरणी नाशिक येथील चार जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सेवानिवृत्त असलेले गोपालसिंग राजपूत यांना प्लॉट घ्यायचा असल्याने त्यांनी ठाणगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील प्लॉटसाठी दोन हजार २०० रुपये टोकन म्हणून दिले होते. त्यानंतर बुकिंगसाठी २ लाख ४० हजार ३९० रुपये दिले. त्यानंतर दुसऱ्या भागातील प्लॉट घेण्यासाठी २ लाख ५५ हजार रुपये दिले. असे एकूण ४ लाख ९५ हजार ३९० रुपये धनादेश व रोखीने दिले होते. मात्र खरेदी खत करून न देता खोटे दस्ताएवज दिले. तसेच घेतलेली रक्कमदेखील परत दिली नाही.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजपूत यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नाशिक येथील वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., सदर कंपनीचे संचालक प्रशांत एन. शेंडे (वय-५९), योगेश एन. शेंडे (वय-४८), व्यवस्थापक राजेंद्र वसंतराव खैरनार (वय-६१) सर्व रा. नाशिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करत आहेत.

Protected Content