छत्तीसगड (वृत्तसंस्था) बिजापूर जिल्ह्यात २८ जून २०१२ रोजी छत्तीसगड पोलिसांनी बनावट चकमकीत नक्षलवादी ठरवत तब्बल १७ गावकऱ्यांना गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक माहिती न्यायालयीन चौकशीत उघड झाली आहे.
न्यायमूर्ती विजय कुमार अग्रवाल यांनी केलेल्या न्यायालयीन चौकशी अहवाल रविवारी हा अहवाल फुटला. त्यानुसार, पोलिसांनी ठार मारलेले लोक नक्षलवादी नव्हते ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिसांना २८ जून २०१२ रोजी काही नक्षलवादी सारकेगुडा येथे रात्री भेटणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. सुरक्षा जवानांनी गावकऱ्यांनी आपल्यावर गोळीबार केल्यानेच प्रत्युत्तर देताना आपल्याकडून गोळीबार झाल्याचा दावा केला होता. मात्र, गावकऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला होता.अहवालातील माहितीनुसार, गावकऱ्यांनी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा खोटा असून मारले गेलेले लोक नक्षलवादी होते, याचा कोणताही पुरावा सुरक्षा यंत्रणा सादर करु शकलेली नाही.