पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । खाजगी व सरकारी वैद्यकीय यंत्रणेला कोरोना विषाणु संक्रमण रोखण्यासाठी कोरोना चाचण्या वाढविण्यावर प्रशासन भर देत असतांनाच दुसरीकडे मात्र कोरोना योद्धे खाजगी डॉक्टर तब्बल गेल्या वीस दिवसांपासून स्वॅब अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये पहूर सह जिल्हाभरात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणु संक्रमण रोखण्यासाठी शासन, प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांनच एक भाग म्हणून संशयित नागरीकांच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. असे असतांना पहूर येथील खाजगी डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांनचे गेल्या वीस दिवसापूर्वी दिलेले स्वॅब तपासणी अहवाल अजुनही प्रतिक्षेतच आहे, परिणामी कोरोना विषाणु संक्रमनाची भीती कायम असतांना संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत आहे. तरी अॅनटीजेन टेस्ट सोबतच, स्वॅब तपासणी अहवाल लवकरात लवकर रूग्णांना मिळाल्यास बाधित रूग्णांनवर वेळेत उपचार करणे शक्य होईल. पुर्वी स्वॅब तपासणी अहवाल साधारनपणे तीन किंवा चार दिवसात येत होते. आज मात्र एकीकडे कोरोना संक्रमणाची लाट दिवसेंदिवस वाढत असतांना स्वॅब तपासणी अहवालासाठी लागणारा विलंब ही एक चिंतेची बाब आहे. यामुळेच की काय पहूर सह परिसरातील कोरोना बाधित रूग्ण दगावल्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.