पाचोरा, प्रतिनिधी । जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरदेवळा येथे शिवसेना आणि युवासेना यांच्यावतीने कोरोना योध्द्यांचा सन्मानपत्र पुष्पगुच्छ व महिलांना पैठणी देऊन या सर्वांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पाचोरा – भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्यासह रावसाहेब पाटील, शिवनारायण जाधव, सुधाकर महाजन, अब्दुल गणी शेख, अंबादास सोमवंशी, अविनाश कुडे आदी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा धोका वाढू नये, सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहावे, लोकांनी शासकीय नियमांचे पालन करावे, कोरोना संदर्भात जनजागृती करणे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेवीका, पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव अतिशय प्रामाणिकपणे व तळमळीने काम करीत आहेत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करणे आपलं कर्तव्य आहे याचं दृष्टिकोनातून जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरदेवळा ता. पाचोरा येथे शिवसेना, युवासेना यांच्यातर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र पुष्पगुच्छ व महिलांना पैठणी देऊन या सर्वांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी बोलतांना सांगितले की, कोरोना महामारीमुळे संपुर्ण जग हादरून गेले आहे. अशा या भयंकर महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडून जनसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या खऱ्या कोरोना योध्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आणि असा सुंदर कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल आयोजकांचेही कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश कुडे यांनी केले तर सूत्रसंचालन हरचंद चव्हाण यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील, नूर बेग, अरविंद परदेशी, वसीम शेख, आबा चौधरी, राजेश जाधव, रविंद्र पाटील, सादिक बागवान, कन्हैय्या परदेशी, भैया महाजन, विनोद चौहान, उमेश लढे, सोनू परदेशी, सुनिल महाजन, रोशन जाधव, सागर जाधव, कडू पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी, पत्रकार बांधव, वैद्यकीय अधिकारी विरेंद्र पाटील, सुवर्णा सदांनशिव, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.