जळगाव प्रतिनिधी । दिनांक १ मार्चपासून केंद्र सरकारने खासगी रूग्णालयात कोरोनाच्या लसीकरणाचा परवानगी दिली असून यात जळगाव जिल्ह्यात डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलसह अन्य मोजक्या रूग्णालयांना यासाठी परवानगी दिली आहे.
सोमवार दिनांक १ मार्चपासून खासगी कोरोना लसीकरणाला परवानगी मिळाली आहे. खासगी हॉस्पीटलमध्ये कोरोनाची लस २५० रूपयांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील ७७५ खासगी हॉस्पीटल्समध्ये ही सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील २८ हॉस्पीटल्समध्ये ही लस उपलब्ध राहणार आहे. यात डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलसह अन्य २७ रूग्णालयांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात खालील हॉस्पीटलमध्ये कोरोनाची लस मिळणार आहे.