जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील पत्रकारांसाठी कोरोना लसीकरण शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्री चेतन दास मेहता हॉस्पिटल येथे करण्यात आला
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार दिड वर्षापासून कोरोना महामारीच्या काळातही जिवांची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. पालकमंत्र्यांच्या कानावर ही मागणी गेल्यावर त्यांनी हे लसीकरण ठराविक एकाच दिवशी आणि एकाच केंद्रावर व्हावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या
पत्रकारांचे प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष व आमदार राजुमामा भोळे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. सर्व पत्रकार प्रिंट मीडिया व ई-मीडिया प्रतिनिधींना लसीकरणात प्राधान्य देण्यात यावे अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. आज आमदार राजू मामा भोळे यांनी या विशेष लसीकरण मोहीम केंद्रास भेट देऊन माहिती जाणून घेतली. महापौर जयश्री महाजन यांनीदेखील लसीकरण केंद्रास भेट देवून कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राम रावलाणी, या लसीकरणासाठी पुढाकार घेणारे राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्यासह जेष्ठ पत्रकार व विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/110509274433234