जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आतापर्यंत 13 लाख 25 हजार 789 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 9 लाख 65 हजार 78 जणांना पहिला डोस तर 3 लाख 60 हजार 711 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज मंगळवार 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता पाठविलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.
जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 9 लाख 65 हजार 78 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 3 लाख 60 हजार 711 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 13 लाख 25 हजार 789 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 6 लाख 14 हजार 551 तर ग्रामीण भागातील 7 लाख 11 हजार 238 नागरीकांचा समावेश आहे. नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज मंगळवार 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.