जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १५९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ५२१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज ४ बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर-९, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-११, अमळनेर-४, चोपडा-१, पाचोरा-१२, भडगाव-७, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-९७, मुक्ताईनगर-२, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १५९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यातच्या आजच्या आकडेवारीनुसार आजवर जिल्ह्यात १ लाख ४० हजार ८९२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३५ हजार २८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३ हजार ४९ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.