कोरोना : आजच्या कोरोना बाधितांचा आकडा चारशे पार !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकुण ४०९ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर १८० बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहरासह भुसावळ आणि चोपडा तालुक्यात संक्रमित रूग्ण संख्येत वाढ कायम दिसून येत आहे.

 

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात दिवसभरात ४०९ रूग्ण आढळून आले आहे. तर १८० रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. यात जळगाव शहर-१५९, जळगाव ग्रामीण-१८, भुसावळ १०६, अमळनेर-५, चोपडा-४३, पाचोरा-९, भडगाव-१३, धरणगाव-६, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-४, पारोळा-९, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-२० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४०९ बाधित रूग्ण आढळले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार ७८५ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ७२६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५८० बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता २ हजार ४७८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत असून नागरीकांनी आपल्या सह आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Protected Content