कोरोना : जिल्ह्यात आज एकही पेशंट नाही; २ झाले बरे !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून आलेल्या कारोना अहवालात आज एकही कोरोना रूग्ण आढळून आले नाही. दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

 

जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आज १ लाख ५१ हजार ५४१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५९१ कोरोनांबाधितांचा मृत्यू झालाय. सध्या जिल्ह्यात ४ कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

 

Protected Content