मुंबई – सुरक्षीततेची योग्य काळजी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे, निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे दिवाळी सुटीनंतर शाळा सुरू होणार हे निश्चित झाले आहे.
सुरक्षीततेची योग्य काळजी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे, निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतच्या हालचाली काही जिल्हामध्ये सुरू झाल्या आहेत. आता यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये शाळा सुरू करण्यासाठीची सर्व नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसार, शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.