कोरोनाचा कहर : जिल्ह्यात आज नव्याने २६६ रूग्ण आढळले; ३९ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालात दिवसभरात २६६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरात कोरोनाने कहर केला असून १११ रूग्ण आढळले आहे. यासह भुसावळ चोपडा आणि चाळीसगाव तालुक्यात संसर्ग कायम आहे.

 

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकुण २६६ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. तर ३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहरात-१११, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-७१, अमळनेर-६, चोपडा-३५, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-३, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २६६ बाधित रूग्ण आढळले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ लाख ४४ हजार ४२८ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ३३३ रूण बरे होवून घरी परतले आहे.  जिल्ह्यात सध्या १ हजार ५१५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५८० बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!