Home आरोग्य कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात आज २० हजार ४८२ रुग्णांची नोंद

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात आज २० हजार ४८२ रुग्णांची नोंद

0
35

 

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार कायम असून आज दिवसभरात २० हजार ४८२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ इतकी झाली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात १९ हजार ४२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यत ७ लाख ७५ हजार २७३ करोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७०.६२ टक्के इतकं झालं आहे. राज्यात सध्या २ लाख ९१ हजार ७९७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. दरम्यान राज्यात ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत रुग्णांची संख्या ३० हजार ४०९ इतकी झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.७७ टक्के इतका झाला आहे. राज्यात आज 20482 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19423 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 775273 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 291797 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता70.62% झाले आहे.


Protected Content

Play sound