जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जळगाव शहरातून आज एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७८८ बाधित रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४० हजार २०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. सध्या ५ बाधित रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. यात २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.