कोरोना : जिल्ह्यात नव्याने २०६ रूग्ण आढळले; ४२३ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज नव्याने २०६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याचे जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालातून दिसून आले आहे. तर ४२३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

तालुकानिहाय आकडेवारी याप्रमाणे

जळगाव शहर-४७, जळगाव ग्रामीण-७, भुसावळ-२४, अमळनेर-१, चोपडा-३०, पाचोरा-०, भडगाव-३२, धरणगाव-७, यावल-८, एरंडोल-४, जामनेर-९, रावेर-९, पारोळा-१, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-०, बोदवड-१३ असे एकुण २०६ कोरोना बाधित आढळून आले.

 

जिल्ह्यात आता सध्या ३ हजार ६७ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत एकुण १ लाख ५० हजार १८५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४४ हजार ५३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५८५ जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Protected Content