कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात १००६ बाधित रूग्ण आढळले; ११२५ झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार १२५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह भुसावळ, चोपडा, एरंडोल तालुक्यात संसर्ग कायम दिसून येत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

आजची आकडेवारी याप्रमाणे

जळगाव शहर-१७३, जळगाव ग्रामीण-४७, भुसावळ-१३०, अमळनेर-६०, चोपडा-९७, पाचोरा-४७, भडगाव-११, धरणगाव-३३, यावल-२५, एरंडोल-७३, जामनेर-३८, रावेर-७०, पारोळा-२०, चाळीसगाव-५०, मुक्ताईनगर-९०, बोदवड-३५ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण १ हजार ६ रूग्ण आढळून आले आहे.

कोवीड अहवालात आजपर्यंत १ लाख १९ हजार ९३४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ७ हजार २६ रूग्ण बरे होवून घरी पतरले आहे. उर्वरित १० हजार ७६६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जिल्ह्यात दिवसभरात २० बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

Protected Content