गयाना वृत्तसंस्था । भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने आज दि. 10 ऑगस्ट रोजी 13 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. गेलची या संघात निवड न होणे हा चर्चेचा विषय ठरत असतांना कोर्नवॉलची निवड सर्वांना अचंबित करणारी आहे.
एंटीग्वा येथे जन्मलेल्या कोर्नवॉरची उंची ही 6.5 फुट आहे आणि त्याचे वजन 140 किलोच्या आसपास आहे. 26 वर्षीय खेळाडूने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पण, त्याला तंदुरुस्तीच्या कारणास्तव संघात स्थान दिले गेले नव्हते. पण, आता टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी संघात त्याला संधी मिळाली आहे आणि तोही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. फिरकी गोलंदाजीसह कोर्नवॉल फलंदाजीतही उपयुक्त खेळी करू शकतो. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 55 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 97 डावांत 24.43च्या सरासरीनं 2224 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक व 13 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 54 झेलही टीपले आहेत. त्याने 23.90च्या सरासरीनं 260 विकेट्स घेतल्या आहेत.