जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित समन्वय २०२४ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, कथ्थक, पंजाबी, गुजराथी नृत्य आणि मराठमोळ्या लावणीद्वारे कलाविष्कार सादर करीत प्रचंड धम्माल केली. सांस्कृतिक कार्यक्रमांनी समन्वयचा जल्लोषात समारोप करण्यात आला.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात समन्वय २०२४ या सात दिवसीय स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. तब्बल पाच दिवस आयोजित करण्यात आलेल्या समन्वय २०२४ कार्यक्रमात आर्टगॅलरी, प्रोम नाईट, होम बॅण्ड, टीचर आणि जे आर नाईट, डि.जे नाईट आणि फनफेअर, कॉन्सर्ट आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले. दि. ३० रोजी समन्वय २०२४ चा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती गोदावरी पाटील, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, पद्मश्री रवींद्र कोल्हे, डॉ. सुहास बोरले, अनिल पाटील, डिन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत आदि मान्यवर उपस्थित होते.
डान्स, गीतांनी केली धम्माल
समन्वय २०२४ च्या समारोपीय समारंभाच्या सुरूवातीला कथ्थक साक्षी संचेती आणि चेतश्री चोरडीया, भरतनाट्यम सृष्टी सोनपसारे हिने सादर करून चाहूल गीताने सुरूवात झाली. त्यानंतर जोगवा, पंजाबी, गुजराथी, दक्षिण भारतीय आणि मराठमोळ्या लावणीने कार्यक्रमात रंगत आणली. तसेच फ्रीस्टाईल नृत्य समन्वयक समीर इद्रिसी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. हिपहॉप, बॉलीवूड, सालसा, इनव्हीक्टस बॅच नृत्य, फनी नृत्य, शौर्य बॅच नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समन्वयच्या आठवणींना उजाळा देत प्रचंड धम्माल केली. ज्युनीअर रेसीडेंट डॉक्टरांनीही यावेळी नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वजिहा खान, राजनंदिनी पाटील, चाहूल मानकर, सानिका कोपणे, निखील जाधव, संस्कृती जाधव, खुशी सुराणा, प्राजक्ता रेले यांनी तर आभार विश्वजीत रहंगाडे या विद्यार्थ्याने मानले. यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे आदीत्य फेगडे, संदेश घुले, नुतेश बेले, निर्मीती भिरूड, चाहूल मानकर, तेजस चाटे, साहील अवताडे, ललीत सोनार, सृष्टी सोनपसारे यांनी परिश्रम घेतले.