एरंडोल शहरात १० दिवसाआड पाणीपुरवठा; युवासेनेचे निवेदन

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहराचा आठ ते दहा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा हा चार दिवसाआड करावा व स्वच्छ पाणी मिळावे, याबाबत जळगाव जिल्हा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.मनोज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी एरंडोल नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.

निवेदनात एरंडोल शहरात सध्या आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असुन सदर पाणीपुरवठा गढूळ,दूषित,दुर्गंधी युक्त असल्याचे म्हटले आहे तसेच २०२३ साली भर उन्हाळ्यात मृतसाठा असूनही चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे म्हटले आहे परंतु सध्या अंजनी मध्यम प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असुन लामंजन पाईप लाईन नगर पालिकेकडे उपलब्ध असुन देखील एरंडोल नगर पालिका नागरिकांना वेठीस धरत असल्याचे म्हटले आहे.यामुळे पाणी शिल्लक असताना देखील नागरिकांना पाणीटंचाई चा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे व शेवटी पंधरा दिवसात जर आठ ते दहा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा हा चार दिवसाआड झाला नाही,स्वच्छ पाणी मिळाले नाही तर मी उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले आहे.

निवेदन देण्यासाठी युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, बापू मराठे, भैय्या लोहार, अमोल तंबोली, बंटी शिरवाणी, गणा चौधरी, नरेश भोई, सोनू ठाकूर, भैया ठाकूर, सचिन पाटील, अमोल धोबी, भानुदास आरखे, दिलीप सोनवणे, निलेश चौधरी, ईश्वर पाटील, भुषण भोई, हरिष गांगुर्डे, चेतन मराठे, रोहीत राजपूत, मयुर मराठे आदी उपस्थित होते.

Protected Content