यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाल येथील दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण केंद्रात नुकताच वनरक्षक प्रशिक्षण सत्राचा दीक्षांत समारंभ व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर प्रशिक्षण सत्र हे सहा महिन्यांचे होते. यात जळगावसह परिसरातील जिल्ह्यांमधून 53 प्रशिक्षणाथनी नोंदणी केली होती. यात वानिकी व अन्य विषयांमधील प्रशिक्षणानंतर परीक्षा घेण्यात आली. यातील सर्व प्रशिक्षणाथनी अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला असून यातील सात जणांनी विशेष प्राविण्य मिळवल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. तर इतरांना उत्तीर्ण प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तर एसएनडीटी महिला महाविद्यालयातील चेतना केंद्राच्या माध्यमातून प्रमाणपत्र पुर्ण करणाऱ्या वनरक्षकांचा प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी नंदकिशोर थोरात, जीवन चोरमले, अमोल सोनवणे, शुभम जाधव व विठ्ठल मुळे यांना विविध विषयांमधील पदके प्रदान करण्यात आली. तसेच, प्रशिक्षणात नंदकिशोर थोरात हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. स्वप्नील गाते यांना रौप्य तर अनिल वाघ यांना कांस्य पदक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल विभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण केंद्राचे संचालक हेमंत शेवाळे, विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर व प्रा. सचिन देवरे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, जमीर शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वाना मार्गदर्शन करतांना प्रशिक्षणाथच्या येणाऱ्या भविष्यकाळात क्षेत्रिय कामात प्रशिक्षणाचा निश्चितपणे उपयोग होवुन ते वनसंरक्षण, वनव्यवस्थापन, व वनसंवर्धनाची कामे अधिक सक्षमपणे करतील व
त्यांच्याकडुन वानिकी विषयक क्षेत्रात समाजाच्या अपेक्षा पुर्ण होतील याबाबत खात्री व्यक्त करुन, सध्याच्या परिस्थितीत वन, व वन्यजीव संवर्धनात उद्भवणाऱ्या समस्या व उपायाबाबत मार्गदर्शन करुन, मानव वन्यजीव संघर्ष यासाठी अधिक जागरुक राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास श्रीमती अंजली बोरावार वनक्षेत्रपाल वनप्रशिक्षण संस्था पाल, अजय बावने वनक्षेत्रपाल रावेर (प्रादेशिक), रागीब अहेमद व्याख्याते, दादासाहेब चौधरी वनप्रशिक्षण संस्थेतील लेखापाल, लिपीक, व इतर सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीकरीता मेहनत घेतली. वनप्रशिक्षणाथचे पालक व नातेवाईक यांच्या मोठया उपस्थितीत
उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.