फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर जवळील मधुकार सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यापुर्वी आमदार शिरीष चौधरी यांना विश्वासात घेण्यात यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखाना सध्या परिस्थितीत भाडे तत्वावर देणे जरूरीचे आहे. साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यापुर्वी शेतकरी व कामागारांच्या हितासाठी या ठरावाला विद्यामान संचालक मंडळासह सर्वांची संमती मिळाल्यानंतर भाडे तत्वावर देण्यासाठी जो काही प्रस्ताव सादर करण्यात येईल तो सक्षत असला पाहिजे. जेणे करून शेतकरी, कामगार व सभासद यांच्या संभ्रमाचे वातावरण निर्माण होणार नाही. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज रविवार ११ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास संचालक मंडळाची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. दरम्यान, मधुकर साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यापुर्वी आमदार शिरीष चौधरी यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी आज काँग्रेस पक्षाने मसाका चेअरमन शरद महाजन यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
यावेळी यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, नगरसेवक केतन किरंगे, चंद्रकांत भंगाळे, प्रसन्न महाजन, विकास पाटील, धीरज कुरकुरे, धीरज पाटील, अभय महाजन यांची उपस्थिती होती.