कोची वृत्तसंस्था । केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी इडन यांची पत्नी अन्ना इडनने फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘नशीब बलात्कारासारखे आहेत, जर ते रोखणे शक्य नसेल तर त्याचा आनंद घ्या,’ असे वादग्रस्त भाष्य पोस्टमध्ये केल्यामुळे सोशल मीडियावर अनेक युझर्सनी अन्ना इडनला चांगलेच सुनावले आहे. महत्वाचे म्हणजे अन्ना इडन स्वत: पत्रकार आहेत.
ॲन्ना इडननं मंगळवारी सकाळी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिचे पती आणि काँग्रेस खासदार हिबी इडन यांचा फोटोही शेअर केला आहे. ‘नशीब बलात्कारासारखे आहेत, जर ते थांबवता आले नाही तर त्याचा आनंद घ्या,’ असे त्यात नमूद केले आहे. या पोस्टवरून खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि ॲन्नासह खासदार हिबी यांच्यावरही टीकेची झोड उठली. या वादानंतर ॲन्ना यांनी माफी मागितली आहे. दरम्यान, कोच्चीमध्ये सध्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. लोकांनी ॲन्नाच्या पोस्टचा संबंध या परिस्थितीशी जोडला आहे. कोच्चीमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीची त्यांनी या पोस्टमधून खिल्ली उडवली आहे, असा आरोप केला जात आहे. या पोस्टवरून मोठा वादंग झाला. सोशल मीडियावर लोकांनी खासदार हिबी यांच्यासह पत्नीवर टीकेची झोड उठवली. वाद निर्माण झाल्यानंतर ॲन्नाने ही पोस्ट फेसबुकवरून हटवली आणि माफीही मागितली.
ज्या महिला या परिस्थितीतून गेल्या आहेत त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी जे शब्द वापरले त्याबद्दल सुद्धा माफी मागते असे अन्ना एडनने आपल्या माफीनाम्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. २०१३ साली माजी सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांनी सुद्धा असेच वक्तव्य केले होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. तुम्ही बलात्कार रोखू शकत नसाल तर आनंद घ्या असे त्यांनी म्हटले होते.