
जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील दापोरेकर मंगल कार्यालय येथे दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या विशेष कार्यक्रमात सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शैलेंद्र सपकाळे यांचा जळगाव पोलीस दलातर्फे गौरव करण्यात आला.

“एक कॅमेरा पोलीसांसाठी” या समाजोपयोगी मोहिमेत सहभाग घेऊन त्यांनी पोलीस प्रशासनाला मदतीचा हात दिला होता. त्यांच्या या कार्याची दखल घेत मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले की, “शैलेंद्र सपकाळे यांनी सामाजिक भान ठेवत पोलीस यंत्रणेला मदत केली, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. समाजात असे व्यक्तिमत्त्व कार्यरत असावे, हे पोलिस दलासाठीही सकारात्मक प्रेरणा ठरते. आम्ही सदैव चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत.”
सपकाळे यांना यावेळी पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या हस्ते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये गोरगरीब जनतेसाठी केलेल्या कामांचे विशेष कौतुक झाले. कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती


