यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री दत्त जयंती निमित्ताने यावल येथे श्री स्वामी समर्थ मंदिरात अखंड नामजप यज्ञयाग व गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू झालेला आहे.
१९डिसेंबर २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत सद्गुरु परमपूज्य मोरेदादा आणि परमपूज्य गुरु माऊली व श्री स्वामी समर्थ यांच्या कृपाशीर्वादाने भुसावळ रोड टेलिफोन एक्सचेंज जवळ यावल यावल शाखा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणित त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे
या सप्ताहाचा काल शुभारंभ झाला असून आज दिनांक २० डिसेंबर २३ बुधवार रोजी सप्ताह प्रारंभ देवता स्थापना अग्नी स्थापना स्थापित देवता हवन होणार आहे. उद्या २१ डिसेंबर २०२३ गुरुवार रोजी नित्य सहकार श्री गणेश याग व श्री मनोबोधयाग २२डिसेंबर २३ शुक्रवार रोजी नित्य स्वाहाकार श्री गीताई याग होणार आहे.
तसेच यानंतर २३ डिसेंबर २३ शनिवार रोजी नित्य स्वाहाकार श्री स्वामी याग २४ डिसेंबर २३रविवार नित्य स्वाहाकार श्री चंडीयाग २५ डिसेंबर २०२३ सोमवार रोजी नित्य स्वाहाकार श्री रुद्रयाग२६ डिसेंबर २३ मंगळवार रोजी नित्य स्वाहाकार श्री दत्त जयंती बलिपूर्णाहुती देण्यात येईल. र७ डिसेंबर २०२३बुधवार रोजी सत्यदत्त पूजन व महा महा आरती सप्ताह सांगता सकाळी १०,३० वाजता महानैवेद्य आरती पुरणाच्या आरती सह सकाळी आठ ते दहा या वेळेत होणार आहे.
दरम्यान, सप्ताहात दररोज गुरुचरित्र पारायण वाचन सकाळी आठ वाजता भूपाळी आरती नंतर प्रत्येकी एक माळ गायत्री मंत्र व श्री स्वामी समर्थ मंत्र नंतर नित्य स्वाहाकार व षोडशोपचार पूजन सकाळी साडेदहा वाजता नैवेद्य आरती त्यानंतर नित्य याग प्रत्येकी एक माळ नवार न व मंत्र व श्री स्वामी समर्थ मंत्र जप दुपारी साडेबारा ते दोन पर्यंत विश्रांती दुपारी दोन ते साडेपाच श्री दुर्गा सप्तमी व श्री स्वामी चरित्र पारायण रूद्राध्याय सायंकाळी घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थिती द्यावी आणि संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल या भावनेने हातभार लावावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ यावल शाखा केंद्र यांच्यामार्फत करण्यात आले आहे.